सिंदेवाही पोलिसांनी अवघ्या काही तासांतच चोरीच्या प्रकरणाचा लावला छडा .

सिंदेवाही पोलिसांनी अवघ्या काही तासांतच चोरीच्या प्रकरणाचा लावला छडा
.
सिंदेवाही नविन बस स्टॅन्ड मध्ये आज रोजी शेतकरी नामे उमेश दादाजी कामडी राहणार गडबोरी तालुका सिंदेवाही हे बाहेरगावी जाण्याकरीता बसमध्ये चढत असताना त्यांना पाठीमागून दोन जणांनी धक्काबुक्की केली असता त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पॅंटीच्या खिशातील पैशांचा बटवा चोरी गेलेला आहे व त्या बटव्या मध्ये असलेले एकूण 6700/- रुपये देखील चोरी गेलेले आहेत. सदर घटनेवरून सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासांमध्येच घटनास्थळावरून बस मध्ये बसून पसार झालेल्या दोन्ही आरोपीताचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले व त्या दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली.फिर्यादी यांनी आरोपींना लगेच ओळखले व त्यांचे समक्ष घेण्यात आलेल्या अंगझडती मध्ये चोरी केलेली एकूण रक्कम 6700/- सुरक्षित मिळून आली. आरोपीं 1) ताजु मोहम्मद शेख 52 वर्ष राहणार भाना पेठ वार्ड ,चंद्रपूर 2) पुरुषोत्तम जनार्दन देविकर रा. जोगी ठाणा, उमरेड नागपूर यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून, पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर,पोलीस हवालदार देवानंद सोनुले,पोलीस शिपाई सतीश निनावे, राहुल रहाटे, मंगेश श्रीरामे, ज्ञानेश्वर ढोकळे यांनी केलेली आहे.
फिर्यादी शेतकऱ्याचे पैसे सुखरूप मिळाल्यामुळे त्यांनी सिंदेवाही पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.