नागभीड शेतशिवार परिसरात ५२ ताश पत्त्यांवर जुगार खेळणारे सात इसमांविरुध्द गुन्हा नोंद
पोलीस स्टेशन नागभीड ची कारवाई
दिनांक २२ डिसेंबर, २०२५ रोजी पो.स्टे. नागभीड हद्दीतील शेतशिवारात बोरीच्या झाडाखाली काही इसम ५२ ताश पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे खात्रीशिर माहिती वरुन नागभीड पोलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकुन रेड केली असता ३ इसम मोटार सायकल ठेवुन पळुन गेले व ४ इसम नामे (१) मल्ला रेड्डी आगा नरडेला (२) गोपीचंद पुनाराम नागपुरे (३) भुपेश महादेव चिलबुले (४) प्रदिप अरुण येरमे सर्व रा. नागभीड हे मिळुन आल्याने त्यांची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता अंगझडतीत व डावावर रोख १४,६५०/- रु. चार नग मोबाईल कि.अं.३१,५५०/- आणि घटनास्थळावरील एकुण ०७ नग मोटार सायकल कि.अं.५,९७,०००/- रु. व इतर साहित्य असा एकुण ६,४३,९५०/- रुपयाचा माल मिळुन आल्याने सदर अटक आरोपी व असुन फरार आरोपी नामे (१) बादल बाबुराव गजभीये, (२) राहुल अशोक पाटील (७) आकाश गुरुदास करकाडे सर्व नागभीड यांचे आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन नागभीड येथे कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे-अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री रमाकांत कोकाटे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिलीप पोटभरे, पोअं/२२० गिरडकर, पोअं/२३४ जितेंद्र मारभते व होमगार्ड २१६१, १२६३, १५१७, १७५४, १८१४ यांनी केली आहे.








