चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराकडुन ०८ चोरीचे गुन्हे उघडकीस

चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराकडुन ०८ चोरीचे गुन्हे उघडकीस

एकुण ५,३०,०००/- रुपयाचा माल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कामगिरी

दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक चंद्रपूर शहरातील चोरीच्या मोटार सायकल आणि चोरटयांचा शोधार्थ पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारांकडुन मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरुन आरोपी नामे प्रतिक उर्फ राहुल वनराज झाडे वय ३५ वर्ष रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर ह.मु. छोटा नागपूर ता. जि. चंद्रपूर यास ताब्यात घेवुन कौशल्यपूर्ण तपास करुन पोस्टे रामनगर, व इमामवाडा (नागपूर) हद्दीतील एकुण ०४ मोटार सायकल, तसेच पोस्टे चंद्रपूर शहर व रामनगर हद्दीतील एकुण ०४ मंदीर/चर्च/बौध्द विहार येथील नगदी रक्कम चोरीचे एकुण ०८ गुन्हे उघडकीस आणले आहे.

सदर आरोपी कडे अधिक विचारपुस केली असता त्याने चंद्रपूर शहरातील –

१) हनुमान मंदीर – दादमहल वार्ड चंद्रपूर

२) लक्ष्मी नारायण मंदीर – मेन रोड चंद्रपूर

३) संत अंद्रिया चर्च – जयंत टॉकीज जवळ चंद्रपूर

४) दिशाभुमी बौध्द विहार- डॉ. आंबेडकर कॉलेज चंद्रपूर

या चार विविध देवस्थान/मंदीर/चर्च/विहारातुन नगदी रक्कम चोरी केल्याची कबुली दिली.

स्दर आरोपीकडुन –

९) होंडा ॲक्टिव्हा क्रमांक MH34-AS-8353 किं.अं.५०,०००/- रु.

२) होंडा शाइन क्रमांक MH27-CK-7050 किं. अं.७०,०००/- रु.

३) बुलेट रॉयल इन्फिल्ड क्रमांक MH31-AS-EX-2471 किं.अं.३,००,०००/- रु.

8) Yamaha R15 क्रमांक MH49-B-0358 किं.अं.५०,०००/- रु.

५) Realme 11X 5G मोबाईल किं.अं.२०,०००/- रु.

६) OPPO A17 मोबाईल किं. अं. २०,०००/- रु.

७) POCO C61 मोबाईल किं. अं.२०,०००/- रु.

असा एकुण ५,३०,०००/- रुपयाचा माल मिळुन आला आहे.

सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, श्री सुनिल गौरकार, पोहवा / सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, पोअं/ हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बादामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.