निर्धारित वेळे पूर्वी बार उघडून मद्य विकी करणारे पॅसिफिक बार वर कारवाई 

निर्धारित वेळे पूर्वी बार उघडून मद्य विकी करणारे पॅसिफिक बार वर कारवाई 

दि.09/10/2025 चे 8/40 वा ते 09/10 दरम्यान पो. स्टे. रामनगर हद्दीतील पॅसिफिक बार बंगाली कॅम्प चौक चंद्रपूर चे अनुद्यप्ती धारक यांनी त्यांना प्राप्त अनुद्यप्ती मधील अटी, शर्ती व नियमांचे उल्लंघन करून निर्धारित वेळे पूर्वी उघडून ग्राहकांना मद्य विकी करतांना मिळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने कायदेशीर कारवाई करून संबंधित अनुद्यप्ती धारक 1)भुवनेश्वर कृष्णकुमार बानोल , वय 26 वर्ष, ( मॅनेजर )रा. महाकाली वॉर्ड चंद्रपूर 2) सदबीरसिंग उर्फ बबलू सलुजा वय 50 रा. नेहरूनगर मूल रोड चंद्रपूर यांच्या विरूद्ध इस्तेखाशा क्रमांक 1932/2025 कलम 33(क्ष) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.

सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलिस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पो नी श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पो उपनी श्री सुनील गौरकार, श्री विनोद भुरले, पो अंमलदार सुभाष गोहोकार, रजनीकांत पुट्टवार, सतीश आवथरे, हिरालाल गुप्ता व इत्यादी स्थानिक गुन्हे शाखेचे चंद्रपूर पथकाने केली आहे