घुग्घुस हद्दीत झालेल्या जबरी चोरी मधील आरोपीचा तात्काळ शोध घेवुन हिसकावुन नेलेला मोबाईल जप्त 

घुग्घुस हद्दीत झालेल्या जबरी चोरी मधील आरोपीचा तात्काळ शोध घेवुन हिसकावुन नेलेला मोबाईल जप्त 

दिनांक 05/10/2025 रोजी चे सायंकाळी फिर्यादी / महीला आपले तिचे जॉब वरून के.बी खान कॉम्प्लेक्स समोरून घरी पायदळ जात असताना एका अनोळखी ईसमाने तिचा पाठलाग करून अंधाराचा फायदा घेवुन तिचे तोंड दाबुन हाथ पकडुन खाली पाडले व ति ओरडल्याने त्या अनोळखी ईसमाने फिर्यादी हिचेकडे असलेला मोटो जि-85, 5 जि कंपनीचा मोबाईल हिसकावुन पळुन गेला. अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो. ठाणे घुग्घुस येथे अप क्र 198/2025 कलम 74, 75, 309 (4) भारतीय न्याय संहीता सन 2023 अन्वये गुन्हा नोद करण्यात आला.

आरोपी नाव – चंदन कुमार सहानी वय 21 वर्ष रा मुजफ्फ नगर बिहार , हल्ली मुक्कामी खान कॉम्प्लेक्स घुग्घुस

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक सा. व उप विभाागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री प्रकाश राउत, पोलीस निरीक्षक, पो. ठाणे घुग्घुस यांनी एक पथक तयार केले. वरिष्ठांचा मार्गदर्शनाप्रमाणे तपास करून आरोपीबाबत कोणताही सुगावा नसताना अतिशय कौशल्यपुर्ण तपास करून त्या अनोळखी ईसमाला अवघ्या 2 तासाचे आत गजाआड आणुन आरोपीकडुन फिर्यादी यांचा हिसकावुन नेलेला मोटो जि-85, 5जि कंपनीचा मोबाईल कि. अं 12,000/- रू हस्तगत करण्यात आला. व आरोपीला अटक करण्यात आले.

सदर कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश राउत, सपोनी सचीन तायवाडे, सपोनी प्रफुल डाहुले, परि पोउपनि गणेश अनभुले, पो.हवा/2215 संजय आतकुलावार, पो. हवा/2508 अनील बैठा, पो.अं/643 नितीन मराठे, पो.अं/2823 प्रसंनजित डोर्लीकर, पो.अ./1150 रवि वाभीटकर, पो.अं/1155 महेश भोयर, पो.अं/330 विजय ढपकास व पो.अं/ 1867 पवन डाखरे यांनी केली आहे.