शिकाऊ परवाने शिबिरांचे आयोजन

शिकाऊ परवाने शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर, दि. 07 : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

शासकीय विश्रामगृह, चिमुर येथे 13 ऑक्टोबर रोजी, शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर येथे 14 ऑक्टो रोजी आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे 15 ऑक्टो रोजी, शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी येथे 16 ऑक्टो रोजी तर एन. एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी 17 ऑक्टोबर रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.