घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पोलीसांनी ठोकल्या बेडया
पोस्टे भिसी येथे दिनांक ०४/१०/२०२५ रोजी फिर्यादी नामे राकेश विजय खोब्रागडे वय २७वर्ष धंदा- राकेश ऑटो अॅण्ड हार्डवेअर भिसी राह. जुनी बँक ऑफ महाराष्ट्र जवळ भिसी ता. चिमुर जि. चंद्रपूर यांचे तोंडी रिपोर्ट दिली की, दि. ०४/१०/२०२५ रोजी मध्यरात्री ०१/०० वा. ते ०२/०० वा दरम्यान अज्ञात आरोपीने त्याचे शनिवार पेठ भिसी येथील राकेश अॅटो व हार्डवेअर चे दुकानाचे शटर चे लॉक तोडुन दुकानाचे आत प्रवेश करुन काउटर मध्ये ठेवलेले ७,३००/- रू व दुकानाशेजारील श्रीकांत सोहनलाल ठोंबरे याचे मालकीचे शरण्या ईलेक्टीकल दुकानाचे शटरचे लॉक तोंडुन दुकानात प्रवेश करुन तिन नग टेबल फॅन किं ७५०० रू व नगदी १५०० रू असा एकुण १६३०० रू चा मुददेमाल चोरून नेला त्यानंतर गावातील काही लोंकांना संशयितरित्या प्रज्वल उर्फ नागेश वामण तुंबेकर हा भिसी शहरात रात्रीदरम्यान फिरत असतांना दिसुन आल्याने त्याला थांबविले असता, त्याच वेळी पोलीस स्टेशन भिसी येथील सरकारी वाहनाने पेटोलींग स्टॉफ पोहचुन संशयित आरोपीतांना ताब्यात घेउन सखोल चौकशी केली असता, सदर आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्याचे सोबत आरोपी क. ०२ दिपक संजय छापेंकर, रा भिसी व आरोपी क. ०३ आयुष उर्फ गट्टु खोब्रागडे रा. भिसी यांनी मिळुन चोरी केल्याचे सांगीतलेवकुन पोलीसांनी तत्काळ आरोपी क. ०२ याचा शोध घेउन पोलीस स्टेशनला आणुन सखोल चौकशी केली असता त्याने सुदधा सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. परंतु आरोपी क. ०३ याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. सदर आरोपी विरूदध पोस्टे भिसी येथे रात्रौदरम्यान घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल करुन आरोपी क. ०१ व ०२ यांला अटक केली. तसेच आरोपी क. ०३ याचा शोध घेण्याकरीता पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान सदर चोरीचा मुददेमाल प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथील युवराज खोब्रागडे हा राहत असलेल्या शासकीय निवासस्थानी ठेउन गि-हाईक मिळाल्यावर विकी करून मिळालेले पैसे आरोपी क. ०१ ते ०३ व युवराज खोब्रागडे यांच्यात वाटप करण्याची ठरवले होते. असे निष्पन्न झाले यातील आरोपी क. ०४ याला अटक करणे बाकी असुन, आरोपी क. ०३ याचा शोध सुरू आहे. सदर घरफोडीतील मुददेमाल आरोपीकडुन जप्त करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले.
सदरचा कार्यवाही मा पोलीस अधिक्षक चंद्रपुर श्री. मुम्मका सुदर्शन सा., मा अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, श्री. ईश्वर कातकडे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर श्री. दिनकर ठोसरे सा. यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो.स्टे भिसी सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोहवा/हिरोज हनवते, पोअं/सतिश झिलपे, पोअं/श्रीकांत वाढई, पोअं/ स्नेहल खोब्रागडे, पोअं/हर्षल दडमल, पोअं/साद शेख यांनी पार पाडली.