घरुन निघुन गेलेल्या, हरवलेल्या व पळविलेल्या मुली/महिलांच्या शोधासाठी जिल्हयात प्रत्येक उपविभागीय स्तरावर एकुण ७ पथक कार्यरत
मागील १० दिवसात ६० मुले/मुली/महिला/पुरुषांचा शोध चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची कामगिरी
आज रोजी सन २०२० आणि सन २०२२ पासुन बेपत्ता असलेल्या दोन महिलेचा शोध
बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र मिसिंग सेल सुरु करण्याची घोषणा राज्य शासनाने जाहीर केल्याने अपर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्हयात उपविभागीय स्तरावर ७ मिसिंग सेल आणि जिल्हा स्तरावर १ मिसिंग सेल असे एकुण ८ मिसिंग सेल स्थापन केले असुन सदरच्या मिसिंग सेल मध्ये एक पोलीस अधिकारी व चार पोलीस अंमलदार यांची नेमणुक केलेली आहे.
उपविभागीयस्तरावर मिसिंग सेलचे नोडल अधिकारी हे संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना नेमण्यात आले आहेत, तर अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या अधिपत्याखाली जिल्हास्तरावरील मिसिंग सेल कार्यरत आहे.
पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे आणि संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व मिसिंग सेल द्वारे दिनांक २७ जुलै, २०२५ ते ०६ ऑगस्ट, २०२५ या १० दिवसात चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून घरुन निघुन गेलेले / हरवलेले / मिसिंग झालेले एकुण २४ पुरुष आणि एकुण २७ महिला असे एकुण ५१ मिसिंग महिला व पुरुषांचा शोध घेण्यास यश आले आहेत. तर अपहरण / पळविलेल्या एकुण २ अल्पवयीन मुले आणि ७अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यास यश आलेला आहे.
सदरच्या मिसिंग सेल मार्फतीने जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन शोध विभक्त झालेल्यांना त्यांच्या प्रियजनांशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्नामुळे अनेक कुटूंबियांचे चेहऱ्यावर मुस्कान येत आहे.









