सिंदेवाही शहरात अहिल्यादेवी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

सिंदेवाही शहरात अहिल्यादेवी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात स्थानिक समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सायंकाळी सहा वाजता मिरवणूक काढण्यात आली. परंपरागत वेशभूषेमध्ये नगरातील संपूर्ण महिला युवक युवती व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर नाचत गाजत नगरातील प्रमुख चौकातून मिरवणूक निघाली. येळकोट येळकोट जय मल्हार, अहिल्यादेवी की जय असा उद्घोष करीत उत्साहात मिरवणूक पार पडली. एकता चौक, बाजार चौक, वाल्मिकी चौक, सिद्धार्थ चौक, मदनापूर, राम मंदिर या मार्गाने मिरवणूक निघाली. अहिल्यादेवी होळकर चौकात मिरवणुकीचे समारोप करण्यात आला. गावातील नागरिकांनी मिरवणुकीला चांगला प्रतिसाद दिला. अहिल्यादेवी ची वेशभूषा केलेली मुलगी घोड्यावर स्वार झालेली होती. सर्वांचे लक्ष ते आकर्षित करीत होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लालाजी मंडलवार, आकाश नस्कुलवार, नागराज देवेवार, दीपक बालूगवार, सुनील गोटेवार, नारायण येगेवार, रवींद्र गोटेवार, सोमेश राचेवार, सोमेश्वर येगेवार, प्रकाश नस्कुलवार, आशु राचेवार, गजानन नवले, विलास धुळेवार यांनी सहकार्य केले.