कोळसा पुनर्वसीत गावाला महसुली दर्जा देण्यासंदर्भात हरकती व सुचना 4 एप्रिलपर्यंत आमंत्रित

कोळसा पुनर्वसीत गावाला महसुली दर्जा देण्यासंदर्भात हरकती व सुचना 4 एप्रिलपर्यंत आमंत्रित

चंद्रपूर, दि. 28 मार्च : मौजा नवीन कोळसा पुनर्वसीत गावाला महसुली दर्जा देण्याबाबत 19 मार्च 2025 रोजी प्रारुप अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबत कोणाच्या हरकती व सुचना असेल तर त्या 4 एप्रिल 2025 पर्यंत सादर करता येतील.

महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) यांच्या कलम 4 पोटकलम (1) च्या परंतुकाखाली राज्य शासनाने दिलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मुल तालुक्यातील नवीन कोळसा हे गाव महसुली गाव म्हणून घोषित करण्याकरीता प्रारुप अधिसुचना 19 मार्च रोजी प्रसिध्द केली आहे. याबाबत काही हरकती व सुचना असल्यास त्या 4 एप्रिलपर्यंत सादर कराव्यात, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रारुप अधिसुचनेत नमुद आहे

मुल तालुक्यात 1 गाव वाढल्यामुळे मूल तालुक्यातील गावांची संख्या 113 झाली असून चंद्रपूर तालुक्यातून 1 गाव कमी झाल्यामुळे चंद्रपूर तालुक्यात आता 101 गावे राहतील.