जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज

 

भंडारा, दि. 18 मे : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालयात पाचगाव तालुका मोहाडी येथे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून सन 2023-24 सत्रासाठी दिनांक 31 मे 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रवेश परीक्षेसाठी उमेदवाराने शैक्षणिक सत्र 2022-23 (एप्रिल 2022 ते मार्च 2023 सत्र)/2022 (जानेवारी ते डिसेंबर 2022 सत्र) चा दहावीचा अभ्यास केलेला असावा. अर्ज करण्यासाठी उमेदवार JNVST वेबसाइट www.navodaya.gov.in अर्ज करू शकतात. निवड चाचणी दिनांक 22 जुलै 2023 असून उमेदवाराची जन्मतारीख 1 जून 2006 ते 31 जुलै 2008 दरम्यान असावी, असे नवोदय विद्यालय समितीने कळविले आहे.