सर्वोदय कन्या विद्यालयाची शैक्षणिक सहल प्रवास पुणे, मुंबई, लोनावला, खंडाला
सिंदेवाही:
शहरातील विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय, सिंदेवाही या शाळेची शैक्षणिक सहल नुकतीच पार पडली. सहलीमध्ये एकूण १६८ विद्यार्थिनीं व १६ शिक्षक वर्ग यांनी सहभाग घेतला होता. सहलीतील विद्यार्थिनींनी शिक्षकांसमवेत विविध धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. यामध्ये पुणे येथील दगडूशेठ हलवाई मंदिर, लाल महल, शनिवारवाडा, राजीव गांधी सर्प उद्यान,लोणावळा-खंडाळा येथील हिल स्टेशन, भुशी धरण,कार्ला मधील एकवीरा आई मंदिर,कार्ला लेणी तसेच मुंबई येथील शांतीवन,गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल,जहागीर आर्ट गॅलरी,जुहू बीच,चैत्यभूमी इत्यादी स्थळांना भेटी दिल्या.
या सहलीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता यादव,पर्यवेक्षक विलास धुळेवार यांनी मार्गदर्शन केले. सहल यशस्वी करण्यासाठी सहल प्रमुख विशाल मुजारीया, प्रा.नितीन खोब्रागडे यांनी व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. सर्वोदय कन्या विद्यालयाच्या या यशस्वी सहली बद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल, सचिव अरविंदजी जयस्वाल यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले आहे.