ज्या व्यक्तींना उच्चरक्तदाब व इत्यादी लक्षणे आढळून आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा,

ज्या व्यक्तींना उच्चरक्तदाब व इत्यादी लक्षणे आढळून आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा,

भंडारा,दि.09 : जिल्ह्यात महाराष्ट्र शासना तर्फे आरोग्य विभागामार्फत असंसर्गजन्य रोग कार्यक्रमामध्ये स्टेमी (ST Elevation Myocardial Infraction) कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयामार्फत मोफत इसीजी काढली जाते व या इसीजी मध्ये काही हृदयजन्य रोग आढळल्यास त्यांचे महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत उपचार करण्यात येते. या कार्यक्रम अंतर्गत लक्ष रुग्णालय भंडारा यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला असून आता पर्यत 10157 लोकांच्या ईसीजी काढण्यात आल्या. यापैकी हृदयरोग असणान्या 16 रुग्णांची अॅजिओग्राफी करण्यात आली असून 3 रुग्णांची अन्जिओप्लास्टी काण्यात आली व 14 रुग्णांना आंतररुग्ण विभागात औषधोपचार काढण्यात आले आहे.

ज्या व्यक्तींना मधुमेह उच्चरक्तदाब, वजन जास्त असणे, चालतांनी दम लागणे, छातीत वेदना.. डाव्या हातात सतत मुंग्या येणे. हृदयरोग, लकवा इत्यादी लक्षणे असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात जाऊन मोफत इसीजी काढण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिपचंद सोयाम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद सोमकुंवर यांनी केले आहे.