अंगणवाडी पर्यवेक्षीका परिक्षा 29 फेब्रुवारीला
भंडारा,दि. 26: जिल्हा परिषद भंडारा पद भरती -2023 अंतर्गतगट-क च्या (वाहन चालक व परिचर वगळून ) 19 संवर्गाची रिक्तपदे भरण्या संबंधाने दिनांक 05 ऑगस्ट, 2023 ला जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीचे अनुषंगाने परीक्षाही ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. त्याकरिता आयबीपीएस कंपनी कडून भंडारा जिल्हयातील अनुक्रमे लते अजय पार्डी मेमो प्राव्हेट लिमिटेड शासकीय औद्योगिक हसारा तुमसर,कै.अजय पारधी, मेमो. प्रा. आयटीआय हसरा तुमसर, ज्ञान ऑनलाइन परीक्षा केंद्र भंडारा व नागपूर जिल्हयातील अनुक्रमे जिंदाल एज्युटेक प्राव्हेट लिमिटेड गोंडखैरी जिंदाल लॉजिस्टिक पार्क 2 समोर. इंडियन ऑइल पेट्रोल पंप जवळ.गोंडखैरी टोल प्लाझा अमरावती रोड नागपूर 440023 अशी एकुण 3 परिक्षा केंद्रे निश्चीत करण्यात आलेली आहेत.
ही परिक्षा केंद्रावर दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 ला अंगणवाडी पर्यवेक्षीका या पदाची परिक्षा घेण्यात येणार आहे. सदर परिक्षे संबंधाने उमेदवारांचे प्रवेश पत्र उपलब्ध करुन घेण्याबाबत चीलींक जिल्हा परिषद भंडाराच्या www.bhandarazp.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
तसेच जिल्हा परिषद,भंडारा अंतर्गत उर्वरीत संवर्गाच्या परिक्षेबाबतची माहिती जिल्हा परिषद भंडाराच्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल. करिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या www. bhandarazp. org या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन आवश्यकती माहिती उपलब्ध करुन घ्यावी. असे आवाहन सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा उपमुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद,भंडारा यांनी कळविले आहे.