भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे पुर्व तयारी प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारी रोजी

भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे पुर्व तयारी प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारी रोजी

       भंडारा,दि.26 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक -2024 अंतर्गत पूर्व तयारी आदर्श आचार संहिता अमलबजावणी प्रशिक्षण 28 फेब्रुवारी,2024 रोजी सकाळी 10  वाजता नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तसेच आगामी 11-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत पुर्व तयारी या प्रशिक्षणाद्वारे करण्यात येणार आहे.

या निवडणूक निर्भय,पारदर्शक व शांततापुर्वक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी सर्व कार्यालय प्रमुखांची आहे.निवडणूकीच्या कालावधीत सर्व कार्यालय प्रमुखांनी आदर्श आचार संहिता अमलबजावणी करणे आवश्यक आहे.यास्तव आदर्श आचार संहिता अमलबजावणी संबंधितांनी प्रशिक्षण आयोजित केले आहे.

तरी  28 फेब्रुवारी,2024 रोजी दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे,तसेच उपविभागीय अधिकारी तथा सहा.निवणूक निर्णय अधिकारी यांनी फिरते पथक व स्थिर पथक FST / SST प्रमुखांनी सभेला उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा नोडल अधिकारी लिना फलके यांनी कळविले आहे.