अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.आत्राम यांनी घेतला विभागातील कामकाजाचा आढावा

अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.आत्राम यांनी
घेतला विभागातील कामकाजाचा आढावा

गडचिरोली, दि.07: अन्न व औषध प्रशासन धर्मराव बाबा आत्राम यांनी विभागाच्या जिल्हयातील अधिका-यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. येणारा काळ सणासुदीचा असून या काळात जिल्हयातील जनतेस निर्भेळ, स्वच्छ व सुरक्षित अन्न मिळण्याकरीता विशेष मोहिमा आखून कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच घाऊक व किरकोळ अन्न व औषध विक्रेत्यांच्या नियमितपणे सखोल तपासण्या करण्याच्या सुचना दिल्या.
अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली कार्यालयास जिल्हा परिषद जवाहर भवन समोर स्वतंत्र कार्यालयाकरीता जागा मंजूर झाली असून मंत्री महोदयांनी सदर जागेची पाहणी करून मंत्रालय स्तरावरुन इमारत बांधकामाकरीता आवश्यक निधी त्वरीत उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.
यावेळी अन्न व औषध विभाग, गडचिरोलीचे सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे, सहायक आयुक्त (औषधे) नीरज लोहकरे, औषध निरीक्षक नालंदा उरकुडे, अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम व इतर कर्मचारी हजर होते.