संपूर्ण जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

संपूर्ण जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

भंडारा,दि.14: राज्यात कोविड टास्क फोर्सने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविलेली असून राज्यात काही भागात कोरोना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच 15 ऑक्टोबर 2021 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच विजयादशमी (दसरा) साजरा करण्यात येणार आहे. राज्यामध्ये ओबीसी बांधवांचे ओबीसी आरक्षणाविषयी मोर्चे, आंदोलने सुरू आहेत. काही भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची तसेच पिकांवर फवारणीकरिता औषधांची मागणी करित आहेत. धान पिकासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी पुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांकरिता भात पिकांसाठी रास्त दरात खते, औषधी उपलब्ध करुन द्यावीत तसेच तत्कालीन सरकारने पेट्रोल, डिझेल, विद्युत दरवाढ कमी करावी, विद्युत भारनियमन बंद करावे. शेतकऱ्यांसाठी लाभकारी योजना घोषित कराव्यात अशा विविध मागण्यांना घेऊन निषेधार्थ राजकीय पक्ष धरणे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परीस्थितीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, शांतता व सुव्यवस्था कायम टिकून राहावी याकरिता 15 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी महेश पाटील यांनी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे.