शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी उपजिल्हारुग्णालय यंत्रणा कटिबद्ध – डॉ.धीरज लांबट यांचे प्रतिपादन

शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी उपजिल्हारुग्णालय यंत्रणा कटिबद्ध – डॉ.धीरज लांबट यांचे प्रतिपादन

 

भंडारा, दि. 13 : जागतिक आरोग्य संघटना केंद्रीय आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र राज्य आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण विभाग यांनी ठरवून दिलेले तंबाखूमुक्त शाळांचे निकष उपजिल्हा रुग्णालय तुमसर परिक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य यंत्रणा व असंसर्गिक रोग विभाग पूर्णपणे सहकार्य करून तंबाखूमुक्त शाळांचा तुमसर तालुका घोषित करण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सुभाष चंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धीरज लांबट यांनी व्यक्त केले.

भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळा शासन निर्णयानुसार सलाम मुंबई फाउंडेशनच्या अधिपत्याखाली शिक्षण विभाग व आरोग्य विभागाचे सहकार्य घेऊन तंबाखूमुक्त करण्याचे कार्य सुरू आहे. शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षकांचे विविध स्तरीय तंबाखूमुक्त शाळांचे प्रशिक्षण व शाळांमधून भेटी देऊन पाठपुरावा करण्याचे कार्य आरोग्य प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक शाळांनी टोबॅको फ्री स्कूल एन्ट्री करून सदर निकष पूर्ण करण्याचे अवलंबिले आहे. कायद्याचा नुसता धाक दाखवून नाही तर प्रत्यक्षात वर्तनुकीतील बदलातून खर्रा, तंबाखूचे सेवन थांबविण्यावर या उपक्रमाच्या माध्यमातून यश मिळेल अशी आशा आहे.

आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या पुढाकाराने व शिक्षण विभागाच्या सहाय्याने स्थानिक शकुंतला सभागृहात 263 शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांचे तंबाखूमुक्त शाळांसाठी डॉ. सूर्यप्रकाश गभने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यात आले. नवनिकष पूर्ण करण्यासंबंधी सूचना देण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी सहकार्य केले.