धान खरेदी केंद्रांवर पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट

0

धान खरेदी केंद्रांवर पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट

 

भंडारा, दि. 8 : पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग तथा सरव्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर यांनी जिल्ह्यातील आष्टी, चिखला, डोंगरी बुज., चिखली, मिटेवानी, चिचोली, मेहगाव, खापा व भंडारा या धान खरेदी केंद्रावर दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी भेटी दिल्या.

 

भेटी दरम्यान खरेदी केंद्रावर धान साठवणूक केल्याचे निदर्शनास आले. खरेदी केंद्र चिखली येथे भेट दिली असता सदर केंद्राचे गोदाम चिखली या गावी नसल्याचे केंद्रप्रमुख यांनी सांगितले. धान केंद्रावर शासनाच्या दिलेल्या निर्देशानुसार खरेदी न झाल्याचे आढळून आल्याने सदर संस्थेवर तात्काळ निलंबनाची कार्यवाहीच्या सूचना यावेळी त्यांनी यावेळी दिल्या. इतर केंद्रांना धान FCI च्या SOP प्रमाणे ठेवण्यात यावे याबाबत निर्देश दिले. व्यवस्थापकीय संचालक यांनी धान खरेदीचा आढावा घेतला असून यात कही धान खरेदी केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here