योगनृत्य परिवारातर्फे ओमनगर परिसराची स्वच्छता

योगनृत्य परिवारातर्फे ओमनगर परिसराची स्वच्छता

 

चंद्रपूर २ डिसेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजीत स्वच्छता अभियान लीग स्पर्धेअंतर्गत योगनृत्य परिवारातर्फे भिवापूर वार्ड येथील ओमनगर परिसरात १ महीना स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छता स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर योगनृत्य परिवाराचे संस्थापक गोपाल मुंदडा, केंद्र प्रमुख कविता कुरेवार यांच्या सहकार्याने ४ नोव्हेंबर पासुन स्वच्छता कार्याला सुरवात करण्यात आली. परिवारातील महीला सदस्यांनी पावडे, घमेले यांच्या सहाय्याने नागमंदिर परिसर व योगनृत्य परिसर येथे साफसफाई तसेच वृक्षारोपण केले. परिसरातील झाडांनाही रंग देण्यात आला.

जनजागरण रॅली तसेच पथनाट्य सादरीकरण द्वारा आपल्या घराप्रमाणेच आजुबाजुचा परिसर स्वच्छ कसा ठेवावा यांची माहीती नागरिकांना देण्यात आली. ३० दिवस चाललेल्या या मोहीमेत नागरिकांनी स्वयंभु सहभाग घेऊन स्वच्छतेचे महत्व जाणले व प्रत्यक्षात आणले. मोहीमेच्या यशस्वीतेसाठी वैशाली बावीस्कर, वंदना भागवत, नूतन सलामे नेहला चिमुरकर,सिमरन खाडीलकर, सरिता दुर्गे, जयश्री नंदनवार, आशाबाई बनकर, वैशाली पोहनकर,राजेश नागपुरे, दुर्गा नागपुरे तसेच संपुर्ण योगनृत्य परिवाराने परिश्रम घेतले.