ज्येष्ठ नागरिक संघ विचारांचे भांडार – आ. किशोर जोरगेवार

वाढदिवसानिमीत्य ज्येष्ठ नागरिक संघात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन.


         ज्येष्ठांच्या विचारांची समाजाला नेहमीच गरज असतेज्येष्ठांचे विचार समाज प्रबोधनासाठी गरजेचे आहे. याच विचारातून सुसंस्कृत समाज घडणे अपेक्षीत असून ज्येष्ठ नागरिक संघ आपल्या अनुभवातून आलेल्या ज्ञाणाचा उपयोग समाज घडविण्यासाठी करत असून हा संघ म्हणजे विचारांचा भांडार असल्याचे प्रतिपादन आ. किशोर जोरगेवार यांनी केले.  
          
आ. किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या रामनगर शाखेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ज्येष्ठांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव पिंपळकरसचिव माणीकराव अंधारेगोसाई बस्कीमारोतराव मत्तेश्रीराम तोडासेयांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगावकरप्रकाश मोहुर्लेअल्पसंख्याक महिला आघाडी शहर संघटीका कौसर खानशहर संघटक राहूल मोहूर्लेसामाजीक कार्यकर्त्या शाहिन शेखरामनगर शहर संघटीका अर्चना मोहूर्लेयांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
  
      यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले किज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून विचारांची देवाण घेवाण आधान प्रधान करण्याचे काम केल्या जात आहे. शहरातील कोणत्याही सामाजीक कार्यात ज्येष्ठ नागरिक संघाचा सल्ला विचारात घेतला जातो ही या संघाच्या कार्याची पावती आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही येत्या काळात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून यात ज्येष्ठ नागरिक संघाचा सक्रिय सहभाग असावा असे आवाहणनही यावेळी बोलतांना आ. जोरगेवार यांनी केले. महिलांच्या आरोग्याबाबत यंग चांदा ब्रिगेड सातत्याने काम करत आली आहे. पूढच्या महिण्यापासून शहरातील विविध ठिकाणी महिलांसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांसाठी स्वंतत्र जिम बनविण्यासाठीही माझे प्रयत्न सुरु आहे. शिक्षण क्षेत्रातही मोठे काम करायचे असून गरीब गरजू मुलांना अभ्यास करता यावा या करीता ठिकठिकाणी नि:शुल्क वाचनालय उभारण्यासाठी शासन पातळीवर माझे प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी ते म्हणालेज्येष्ठ नागरिक संघानेही जागा उपलब्ध करुन दिल्यास वाचनालयासाठी निधी मि देणार असा शब्दही यावेळी बोलतांना आ. किशोर जोरगेवार यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमीत्य आ. किशोर जोरगेवार यांचा केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.