मतदान नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी विशेष शिबिर

मतदान नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी विशेष शिबिर

 

भंडारा, दि. 29 : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 राबविण्यात येत आहे.

 

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत असून मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक 3 डिसेंबर 2022 (शनिवार) व 4 डिसेंबर 2022 (रविवार) या दिवशी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयात शिबिराचे आयेाजन करण्यात येणार असून मतदान केंद्रावर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.