प्रादेशिक परिवहन विभागाच्या सेवा फेसलेस पद्धतीने उपलब्ध

प्रादेशिक परिवहन विभागाच्या सेवा फेसलेस पद्धतीने उपलब्ध

 

भंडारा, दि. 23: केंद्र शासनाने परिवहन विभागाच्या 58 सेवा फेसलेस पध्दतीने नागरिकांना देण्याबाबतचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात यापैकी 9 सेवा यापूर्वीच नागरिकांना फेसलेस पध्दतीने देण्यात येत आहे. फेसलेस सेवेमध्ये अनुज्ञप्ती मध्ये (लायसन्स) मोबाईल नंबर अद्ययावत करणे, अनुज्ञप्ती ची माहिती मिळविणे, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती व कंडक्टर अनुज्ञप्तीचे नुतनीकरण करणे या सेवा सुरू करण्यात आल्या आहे. या सेवा आधार क्रमांकाचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरून नागरिकांमार्फतच करण्यात येते. या सेवेकरिता नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. अशा फेसलेस पध्दतीच्या अर्जाची छाननी कार्यालयाद्वारे करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.