भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

 

भंडारा, दि. 21 : भंडारा तालुक्यातील माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या 39 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोग यांच्या कडून निवडणूक कार्यक्रम प्राप्त झाला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी नमुना अ निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे, दिनांक 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रिया, दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन मागे घेणे व दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप करणे सदर कार्यक्रम बचत भवन तहसिल कार्यालय भंडारा या ठिकाणी करण्यात येणार आहे. दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान होतील व दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी करण्यात येईल, असे भंडाऱ्याचे तहसिलदार अरविंद हिंगे यांनी कळविले आहे.