सिंदेवाही तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा टेकरी येथे संपन्न

सिंदेवाही तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा टेकरी येथे संपन्न

सिंदेवाही तालुक्याच्या माध्यमिक शाळेच्या शालेय कबड्डी स्पर्धा इंदिरा गांधी विद्यालय टेकरी येथे संपन्न झाल्या उदघाट्निय कार्यक्रम उदघाटक प्रेमकुमार हरणे सचिव ज्ञानसंवर्धन संस्था मोहाळी यांच्या हस्ते संपन्न झाले, ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला मालार्पण करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इंदिरा गांधी विद्यालय टेकरीचे मुख्याध्यापक अगळे सर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून विजय नैताम उपसरपंच टेकरी, मोगरे सर तालुका क्रीडा संयोजक, देवेंद्र मंडलवार तंटा मुक्ती समिती अध्यक्ष, यशवंत सूर्यवंशी माजी सरपंच,भूपेश लाखे कोशाध्यक्ष ज्ञान संवर्धन संस्था मोहाली, कैलास मेश्राम सर, निखारे सर तसेच तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेचे क्रीडा शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन मांडवकर सर यांनी केले स्पर्धेचे पंच म्हणून सारंग गुज्जनवार , देवा मंडलवार, रवी झाल्लरवार, निखिल कामडी यांनी जबाबदारी सांभाळली