महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल व प्रियदर्शिनी इंदिरा गांधींना अभिवादन / मनपाच्या सर्व शाळामंध्ये राष्ट्रीय एकता दिवसाचे आयाेजन

महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल व प्रियदर्शिनी इंदिरा गांधींना अभिवादन

मनपाच्या सर्व शाळामंध्ये राष्ट्रीय एकता दिवसाचे आयाेजन

चंद्रपूर, दि.31 आॅक्टोबर: प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांचा स्मृती दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मनपा उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, कवडू नेहारे, विकास दानव,वारूलवार,प्रदीप पाटील, गणेश राखुंडे, मयूर मलिक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपाच्या शाळांमध्ये राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन

शहरातील मनपाच्या सर्व शाळांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेमध्ये राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नित यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तथा भारतरत्न, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता दौडमध्ये भाग घेऊन राष्ट्रीय एकतेप्रती आपली एकनिष्ठता दाखवली. सदर कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नित, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.