राष्ट्रीय एकता दौड स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय एकता दौड स्पर्धेचे आयोजन

गडचिरोली, दि.28: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्याने सोमवार दि. 31 ऑक्टोंबर, 2022 रोजी “राष्ट्रीय एकता दौड” (UNITY RUN)साजरा करण्याच्या निमित्याने राज्यात सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी व महत्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रीय एकतेची शपथ व एकता दौड आयोजन करण्याचे शासनाने निर्देशित करण्यात आलेले आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे दि. 31 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता “राष्ट्रीय एकता दौड (UNITY RUN)पुरुष व महिला गटात अनुक्रमे 5 कि.मी. व 3 कि.मी. अंतराची दौड स्पर्धा स्थानिक इंदिरा गांधी चौक येथून आयोजीत करण्यात येणार आहे.

तरी सदर एकता दौडमध्ये जिल्हयातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी, नागरीक, शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी यांना सहभागी होण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी आवाहन केले आहे.