अनुसूचित जमाती कल्याण समितीने केला सातही तालुक्यांचा दौरा विविध गावांना भेटी देवून कामाची पाहणी

अनुसूचित जमाती कल्याण समितीने केला सातही तालुक्यांचा दौरा

  • विविध गावांना भेटी देवून कामाची पाहणी

भंडारा, दि. 29 : विधीमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सदर समितीने शुक्रवारी सातही तालुक्यांचा दौरा केला. विविध पथकाव्दारे समितीच्या सदस्यांनी गावांना भेटी देवून प्रत्यक्ष कामांची पाहणी केली.
यात मोहाडी तालुक्यातील वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी क्र.10, सिमेंट नाला बांध, डोंगरगाव येथील कुक्कट पक्षी संगोपन केंद्र तसेच तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तुमसर शहरातील उपजिल्हा रुग्णालय, येरली येथील अनुदानित आश्रम शाळा, आयुर्वेदीक दवाखाना, मोठागाव येथील देवनारा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, सुसरडोह येथील ठक्कर बाप्पा योजना सिमेंट रस्ता, विटपूर येथील रोपवन आदिंची पाहणी केली.
सदर समितीने भंडारा तालुक्यातील गराडा येथील ठक्कर बाप्पा योजना-सिमेंट कॉक्रेट नाली बांधकाम, कारधा येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळा, लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील अंगणवाडी, रेंगेपार कोठा येथील बिरसा मुंडा क्रांती योजनेतील विहीर, साकोली तालुक्यातील वनधन केंद्र, वसतीगृह बांधकाम, उपजिल्हा रुग्णालय, जमनापूर येथील कृषीपंप, पवनी तालुक्यातील नेरला येथील शबरी घरकुल, कन्हाळगाव येथील गाय गट, शेततळे, खातखेडा येथील शेळी गट, पवनी शहरातील ग्रामीण रुग्णालय, वाही येथील बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील नवीन विहीर, भुयार येथील सुक्ष्म सिंचन योजनेची पाहणी तसेच लाखांदूर तालुक्यातील ग्रामीण रुगणालय, झरी येथील शेळी गट, गाय गट, दहेगाव येथील सुक्ष्म सिंचन योजना, सौरपंप आदिंची पाहणी केली. यावेळी समितीने विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची भेट घेतली.
सदर समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा असून इतर सदस्यांमध्ये आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, श्रीनिवास वनगा, अनिल पाटील, सहसराम कोरोटे, राजेश पाडवी, भीमराव केराम, राजकुमार पटेल, किरण सरनाईक, रमेश पाटील यांचा समावेश आहे.