बामणवाडा येथे श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांच्या हस्ते विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

राजुरा / प्रतिनिधी
राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथील विद्यार्थ्यांना श्रमिक एल्गार च्या वतीने श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांच्या हस्ते शैक्षिणक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

कोरोना संकटात शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नसल्याने गावात अभ्यासिका वर्ग सुरू करून विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्न श्रमिक एल्गार संघटनेने सुरू केला आहे.

बामणवाडा येथील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य म्हणून बुक, पेन, रंगकांडी, मास्क, व इतर साहित्य देण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुरा चे शिक्षक एल. टी. मडावी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दिलेल्या साहित्याचा वापर विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी करावा असे आव्हान घनशाम मेश्राम यांनी केले.

यावेळी बामणवाडा येथील विद्यार्थी सपना आत्राम, पायल टेकाम, श्रेया करमनकर, गायत्री आत्राम, विधांशा दयानंद आत्राम, कैलाश दयानंद आत्राम, आर्यन आत्राम, पारस श्रीनिवास मारपेल्ली, आरूष मारपेल्ली, रेयांस आत्राम, आयुष मेश्राम यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.