चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे महिनाभरात चार रक्तदान शिबिर

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे महिनाभरात चार रक्तदान शिबिर

चंद्रपूर, ता. ७: कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असतांनाच डेंग्यु, मलेरीया या आजारांचे रुग्णसुध्दा सर्वत्र आढळून येत आहे. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने मनपा कार्यक्षेत्रात सप्टेंबर महिन्यात दर आठवड्यात एक असे एकूण ४ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेत.


बुधवार, ता. ८ सप्टेंबर रोजी चंद्रपूर महानगरपालिका कार्यालय मुख्य इमारत गांधी चौक येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान होईल. यात मुख्य प्रशासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी रक्तदान करणार आहेत. १४ सप्टेंबर २०२१ सकाळी १० ते   दुपारी २ वाजेपर्यंत मनपा झोन कार्यालय क्र. १, संजय गांधी मार्केट नागपूर रोड येथे, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत मनपा झोन कार्यालय क्र  २ सात मजली इमारत, गांधी चौक येथे, २८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५पर्यंत मनपा झोन कार्यालय क्र. ३ बंगाली कॅम्प, मूल रोड येथे  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात मोठ्या संख्येत नगरसेवक, नागरिक आणि कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन 
महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.