भंडारा | महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा आज जिल्ह्यात स्टार्ट

भंडारा | महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा आज जिल्ह्यात स्टार्ट

भंडारा, दि. 19 : 15 ऑगस्टपासून सुरू झालेली महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा उद्या 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुका येथे पोहचत आहे. या स्टार्टअप यात्रेचा थांबा हा सकाळी 9 ते 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहाडी, सकाळी 11 ते 12 वाजता नटवरलाल पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहाडी, दुपारी 2 ते 3.30 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर, दुपारी 3.30 ते 4.30 वाजता महिला महाविद्यालय, तुमसर, दुपारी 4.30 ते 5.30 वाजता मायनिंग आयटीआय तुमसर येथे असणार आहे. तरी परिसरातील व तालुक्यातील विद्यार्थी, नवउद्योजक व सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की सदर यात्रेमध्ये सहभागी होवून यात्रेची परिपूर्ण माहिती घ्यावी व आपल्याकडील नवसंकल्पनांना चालना देत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे.