मंडल यात्रेेचा आज ७ ऑगस्ट रोजी नागपूरात समारोप

मंडल यात्रेेचा आज ७ ऑगस्ट रोजी नागपूरात समारोप

भंडारा – ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी ‘मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात 1 आँगस्टरोजी काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचा उद्या रविवारला 7 आँगस्ट रोजी नागपूर येथील दिक्षाभूमी येथे होत आहे.त्यानंतर या यात्रेचा समारोपानिमित्त मार्गदर्शन मेळावा सेवादल महाविद्यालय सक्करदरा(नागपूर) येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

विदर्भातील सात जिल्ह्यात या मंडल यात्रेला ओबीसी बहुजन समाजाने उत्स्फुर्ते प्रतिसाद दिला आहे.या यात्रेचा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.प्रदीप ढोबळे राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून सेवादल महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय़ शेंडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे,समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.दिवाकर गमे,सेस्फ रिस्पेक्ट मुव्हमेटंचे संयोजक बळीराज धोटे, लोकजागरचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर, संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे, नितेश कराडे, प्रदीप बोनगिरवार, प्रदीप गायकवाड, ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे, ओबीसी सेवा संघ गोंदियाचे अध्यक्ष प्रा.बी.एम. करमरकर, अशोक लंजे, तिर्थराज उके, प्रफुल्ल गुल्हाने, भोयर-पवार महासंघाचे अध्यक्ष प्रा.नामदेव राऊत, श्रावण फरकाडे, कृष्णा बेले, रासपचे प्रदेशाध्यक्ष प्रा.रमेश पिसे, विजय बाभुळकर, वंदना वनकर, पाटी लावा अभियानाच्या संयोजिका अ‍ॅड. डॉ.अंजली साळवे, भारतीय पिछडा शोषित संघटनेचे विलास काळे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, ओबीसी जनगणना समन्वय समितीचे सदानंद इलमे, ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते, सोशल युथ फार जस्टीसचे प्रमोद केसलकर, भानुदास केळझरकर, डॉ.बाळकृष्ण सार्वे,प्रा.अनिल डहाके उपस्थित राहणार आहेत.

तर सत्कारमुर्ती म्हणून नागेश चौधरी, प्रा.नामदेवराव जेंगठे, प्रा.श्याम झाडे, भाऊराव राऊत, शैल जैमीनी,यामीनी चौधरी, सुनिता काळे, संध्या राजुरकर, नुतन माळवी, सध्या सराटकर,छाया कुरूकटर, पांडुरंग काकडे, गोविंद वरवाडे, डॉ. गुरुदास येडेवार, अशोक चोपडे, विजय बाभुळकर, यशवंत सराटकर, अनुल हुलके आदिंचा सत्कार करण्यात येणार आहे.

समारोप कार्यक्रमाला ओबीसी बहुजन चळवळीतील बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोर्राम,खेमेंद्र कटरे,दिनानाथ वाघमारे,मुकुंद आडेवार, पियुष आकरे,वंदना वनकर,प्रा.अनिल डहाके,गोपाल सेलोकर आदिंनी केले आहे.