महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या दोन….

महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत

गडचिरोली,दि.17: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्य दिनांक 31 मे रोजी जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देउन करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार हा दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी अभिप्रेत आहे. सदर पुरस्कार सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ प्रति महिला रोख रक्कम रु.500/-याप्रमाणे अनुज्ञेय आहे.

उपरोक्त पुरस्काराकरीता महिला हया त्याच ग्रामपंचायत/ गट ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असणे बंधनकारक असेल व त्यांनी त्याच ग्रामपंचायत क्षेत्रात कार्य केले असणे आवश्यक आहे. तसेच महिलांच्या समस्या प्रश्नाबाबत जाणीव व सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असणाऱ्या महिलांनी स्वत:ची वैयक्तिक व केलेल्या कार्यक्रमाच्या माहितीसह संबंधित ग्रामपंचायतकडे दिनांक 20 मे 2023 पर्यत सादर करावे. याप्रमाणे इच्छुक महिलेने स्वत:ची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह संबंधित ग्रामपंचायतीकडे दिनांक 20 मे 2023 पर्यंत सादर करण्यात यावा.