झेंडयासोबत सेल्फी काढून अपलोड करा जिल्हा प्रशासनाकडून ॲपची निर्मिती

झेंडयासोबत सेल्फी काढून अपलोड करा जिल्हा प्रशासनाकडून ॲपची निर्मिती

भंडारा, दि. 5 : ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाला जिल्हाभर प्रतिसाद मिळत आहे. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात झेंडयासोबत उत्तम सेल्फी काढून तो अपलोड करावयाचा आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने हर घर तिरंगा या नावानेच ॲप तयार केले आहे.

आज या ॲपचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांच्यासह राष्ट्रीय सूचना केद्रांचे संचालक संदीप लोखंडे व वैज्ञानिक सुरेश वासनिक उपस्थित होते.

हर घर तिरंगासाठी जिल्हयातील तालुक्यात व गावात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.लाखनी तालुक्यात तीन गावांनी या कार्यक्रमाला शंभर टक्के प्रतिसाद देत त्या ग्रामपंचायतींनी तिरंगा खरेदी मोठया प्रमाणावर केले आहे.

या ॲपसाठी स्मार्ट फोनधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरून हे ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर तेथे नागरिक नोंदणी व नोंदणी शोधा हे दोन पर्याय आहेत. तिथे मोबाईल नंबर टाकावा. त्यांनतर जिल्हा, तालुका निवडावा व स्वतचा झेंडयासोबतचा सेल्फी अपलोड करावा.

राज्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर बैठका झाल्या असून प्रत्येक विभाग विविध कार्यक्रमाचे आयेाजन करत आहे. ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत राशन दुकाने,शासकीय इमारतीवर हर घ्र तिरंगाचे पोस्टर,बॅनर लावण्यात येत आहे. तिरंगा विक्री केंद्राना चांगला प्रतिसाद मिळत आहे.