आरसेटीद्वारा दहा दिवशीय  निशुल्क प्रशिक्षण

आरसेटीद्वारा दहा दिवशीय  निशुल्क प्रशिक्षण

भंडारा दि 23:  बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार  प्रशिक्षण संस्थाद्वारे निशुल्क दहा दिवशीय दुग्ध व्यवसाय व गांडुळ  खत तयार करण्याचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 26 ऑगस्ट 2021 रोजी गुरूवार पासुन करण्यात आले आहे.

दहा दिवशीय प्रशिक्षणात गाय-म्हशी च्या जाती, औषधोपचार, लसिकरण, पालन पोषण, शेड बांधकाम, गांडुळखत तयार करणे व कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकिय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायातील संधी बाजार सर्वेक्षण, बँकेच्या कर्ज योजना, शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली जाईल. प्रशिक्षण प्रवेशाकरिता आयोजित मुलाखतीकरिता येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा  दाखला, गुणपत्रिका, राशन कार्ड, आधार कार्ड, मनरेगा (जॉब) कार्डं याची झेरॉक्स सोबत आणने आवश्यक आहे.

या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांना जेवन, नास्ता, चहा, वह्या-पुस्तके, राहाणे आदिंची सोय मोफत (निशुल्क) केली जाईल स्यरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे महिला व पुरूष भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असावे.

वय 18 ते 45 वर्षे शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा बेरोजगार महिला व पुरूषांनी मुलाखती करीता 26 ऑगस्ट 2021 पर्यंत सकाळी 9.30 वाजेपर्यंत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, आरसेटी बिल्डींग लाल बहादुर शास्त्री (मनरो) हायस्कुल ॲन्ड जुनियर कॉलेज शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निर्देशक एस.डी. बोदेले यांनी केले आहे.