मधमाशा संरक्षण व संवर्धनाकरीता जिल्हा ग्रामोद्योग विभागाकडून अनुदान योजना

मधमाशा संरक्षण व संवर्धनाकरीता जिल्हा ग्रामोद्योग विभागाकडून अनुदान योजना

गडचिरोली, दि.21:महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने लाभ घेण्याकरीता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेमध्ये पात्र उमेदवारांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण साहित्यांच्या स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के गुंतवणूक शासनाच्या हमी भावाने खरेदी विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करुन देण्यात येणार आहे. इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी भास्कर मेश्राम यांनी केले आहे.