रेस्क्यू ऑपरेशन मुळे 2 युवक सुखरुप बाहेर

रेस्क्यू ऑपरेशन मुळे 2 युवक सुखरुप बाहेर

गडचिरोली, दि.18: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (पोलीस दल) गडचिरोली व राज्य आपत्ती प्रतिसादर नागपूर टिम क्रमांक 1 यांनी दिनांक 17 जूलै 2022 रोजी माडेमूल येथील मृतदेह पोहचवून परत येत असतांना रानमूल व माडेमूल मधील नाल्यावर ॲम्बूलन्स चालक व सहायक (यशवंत गुणाजी कांबळे रा.कोटगल व वैभव मोरेश्वर नंदेश्वर रा.नवेनाव ) यांच्या सभोवताल पाणी झाल्याने त्यांना त्यातुन निघता येत नव्हते. सदर बाब रेस्क्यू टिम यांच्या लक्षात येताच तहसिलदार महेंद्र गणवीर, SDRF चे पो.नि.एम.एम.लांबेवार व पोलीस निरिक्षक देशपांडे, सा.मो.प.वि.गडचिरोली यांचे कडुन रेस्क्यू ऑपरेशन करुन सदर दोन युवकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

रेस्क्यू वर चेनाव-NPC/1049 टेकाम, परेदशी, महांदे,चव्हान, शेणकपाट,कोल्हे, टेकाडे,पहाडे, चाकले,कनिरे, झलेके, बेलेकर जूनघरे, चामरे व पुर्ण टिमने सहकार्य केले.