सिंदेवाही | विनयभंग करनार आरोपीस ५ वर्ष शिक्षा व ५००० रु.दंड

सिंदेवाही | विनयभंग करनार आरोपीस ५ वर्ष शिक्षा व ५००० रु.दंड

पोलीस स्टेशन सिंदेवाही परीसरातील अनुसुचित जातीतील अल्पवईन मुलीला आरोपिने आपले घरी नेऊन लैंवगक अत्याचार करणार आरोपीस दिनांक १६/०७/२०२२ रोजी मा.श्री.अनुराग दीक्षित सत्र न्यायाधीश न्यायालय चंद्रपुर यांनी ५ वर्षे कारावासाची शिक्षा व ५००० रु.दंडाची शिक्षा सुनाविली आहे.

फिर्यादीची अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिनसह घरी खेळताना आरोपी नामे मधुकर आत्राम रा.रामाळ,ता. सिंदेवाही, जि.चंद्रपुर यांनी आपले घरी नेउन लैंगिक अत्याचार केला असताना फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन अप.क्र.६७६/२०१९ कलम-३४२,३७६,(१) (ए) (ए बी ),५०६ भा.द.वि. व R/W ४,१०पोक्सो.कायदा ,R/W ३(२)(V ) अ.जा.ज .प्र. कायदा चा गुन्हा नोंद करण्यात आला .

सदर चा गुन्हा तपासात घेतल्यावर तपास अधिकारी श्री मिलिंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी ,ब्रम्हपुरी यांनी आरोपी निष्पन्न करुन पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.न्यायालयाचे सुनावनी दरम्यान सदर प्रकरणात साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक १६/०७/२०२२ आरोपी मधुकर आत्राम रा.रामाळ,ता.सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यास मा.न्यायालयाने कलम-३४२,३७६,(१) (ए) (ए बी ),५०६भा.द.वि., व R/W ४,१०पोक्सो. कायदा, R/W ३(२)(V ) अ.जा.ज .प्र. कायदा मध्ये ५ वर्ष सजा व ५००० रु.दंड ,दंड न भरल्यास १ वर्ष सजा, मा .श्री. अनुराग दीक्षित सत्रन्यायाधीश न्यायालय चंद्रपुर यांनी सुनाविली आहे.

सदर प्रकरण मध्ये स्वाती देशपांडे सरकारी वकील आणि कोर्ट पैरवी पो.हवालदार .४५६ मनोहर उरादपहारे पो.स्टे. सिंदेवाही यांनी काम पाहिले.