सिंदेवाही शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात…. कांग्रेसचे सत्ताधारी नगरसेवक पंकज नन्नेवार व दिलीप रामटेके यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन.

सिंदेवाही शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात….

कांग्रेसचे सत्ताधारी नगरसेवक पंकज नन्नेवार व दिलीप रामटेके यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन.

सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.१ ते १७ मधील विविध ठिकाणी पावसाळ्याचे पाणी साचत असल्याने व नाल्यांची योग्य सफाई न झाल्याने सांडपाणी, नाल्यांमध्ये जमा राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

अनेक ठिकाणी स्वच्छता नसल्याने डेंगु, मलेरिया सारख्या जिवघेणा आजार होण्याची दाट शक्यता असल्याने कांग्रेसचे सत्ताधारी नगरसेवक पंकज नन्नेवार व दिलीप रामटेके पाणी पुरवठा सभापती यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी घेत नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतच परिसराची स्वच्छता करून औषधी फवारणी करावी अशी मागणी निवेदनातुन केली आहे.