योगाला दैनंदिन जिवनाचा भाग बनवून आरोग्य निरोगी राखावे- हंसराज अहीर

योगाला दैनंदिन जिवनाचा भाग बनवून आरोग्य निरोगी राखावे- हंसराज अहीर

चंद्रपूर:- प्राचीन काळापासून भारतीय ऋषीमुनींनी योगविद्या आत्मसात करुन या विद्येचा अखिल मानवी कल्याणासाठी उपयोग करुन लोकांचे जीवन निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले आज बदलत्या काळात योगविद्या जागतिक स्तरावर पोहचल्याने व या विद्येचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे योगाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी जागतिक स्तरावर योगाचे महत्व विषद करून “जागतिक योगदिवस” साजरा करण्याचे आवाहन केल्याने आज हा दिवस जगभरातील अनेक राष्ट्र साजरा करित असल्याने देशाच्या संस्कृती व परंपरेचा मोठा बहुमान असल्याचे सांगत योग हा एकदिवसाचा प्रयोग नसुन तो रोजचा भाग बनवुन स्वतःला निरोगी ठेवावे असे पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले.

भाजपा महानगर चंद्रपूर व महिला पतंजली योगसमिती च्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जुन रोजी आंतरराष्ट्रीय योगदिवसानिमित्त रामबाग फॉरेस्ट ग्राउंड येथे आयोजित सामुहीक योगमहोत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. हंसराज अहिर यांनी सांगितले कि योगविद्येने अनेक दुर्धर आजारांवर मात करणे शक्य आहे. कोरोना संकटात योगविद्येने अनेकांचे प्राण वाचविले आहे. योगगुरु स्वामी रामदेवबाबांनी ऋषीमुनींच्या काळातील ही विरासत या काळात जिवंत करीत या विद्येला महत्व प्राप्त करुन दिले प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर या विद्येचा प्रचार प्रसार केला असेही श्री अहिर यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी योगविद्येचे महत्व विषद करून प्रत्येकांनी संपूर्ण वर्षभर योगसाधना केल्यास निश्चितच सर्वाचे आरोग्य रोगविरहीत राहील असे सांगितले या आयोजनामागील पक्षाची भूमिका विषद केली. आजचा हा दिवस मानवतेला समर्पित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, माजी उपमहापौर राहुल पावडे, महिला मोर्चा अध्यक्ष अंजलीताई घोटेकर, महामंत्री रविंद्र गुरनूले, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवि लोणकर, संदीप आगलावे, पुनम तिवारी, महानगर उपाध्यक्ष अरुण तिखे, ओबीसी मोर्चा महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, अनु. जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे, सचिव उमेश आष्टनकर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, चंद्रकला सोयाम, माया उईके, उपाध्यक्षा प्रभा गुळधे, मंजुश्री कासनगोट्टुवार, महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा बोरगमवार, राकेश बोमनवार, रामकुमार आकेपेल्लीवार, राजकुमार पाठक, मनोहर टहलियानी, स्मिता रेभनकर, वरिष्ठ योग शिक्षिका ज्योती मसराम, अपर्णा चिडे, वंदना भुषणवार, नसरिन शेख, स्मिता श्रीगडीवार, वंदना संतोषवार, लता चापले, अंजुशा दलाल, कल्पना कोयलवार, प्रतिभा रोकडे, मोनिषा महतो, शिला चव्हाण,किरण बुटले,पुरुषोत्तम सहारे,रुद्रानारायण तिवारी,अमित निरंजने, डॉ. किरण देशपांडे, प्रमोद शास्त्रकार, नितिन कारिया, विक्की मेश्राम यांचे सह बहुसंख्य भगिनींची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे संचालन नसरिन शेख यांनी केले तर आभार सुभाष कासनगोट्टुवार यांनी मानले.