शुक्रवारी भंडारा जिल्ह्यात आठ कोरोना बाधित

शुक्रवारी भंडारा जिल्ह्यात आठ कोरोना बाधित

 एकूण डिस्चार्ज 66776

एकूण पॉझिटिव्ह 67949

क्रियाशील रुग्ण 31

आज मृत्यू शून्य

 एकूण मृत्यू 1142

 रिकव्हरी रेट 98.27 टक्के

 मृत्यू दर 01.68

 आजच्या टेस्ट 739

 एकूण टेस्ट 607035

भंडारा, दि. 17 : जिल्ह्यात शुक्रवारी आठ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज (दि.17) बरे झालेल्या रुग्णांची संख्या शून्य आहे. शुक्रवारी 739 व्यक्तींची चाचणी केली असता आठ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 31 सक्रिय रुग्ण आहे. सक्रिय असलेल्या 31 बाधित रुग्णांपैकी 31 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 66 हजार 776 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 67 हजार 949 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.27 टक्के आहे. आतापर्यंत 6 लाख 7 हजार 35 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 67 हजार 949 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 01, मोहाडी 01, तुमसर 01, पवनी 04, लाखनी 01, साकोली 00 व लाखांदूर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1142 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.