भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या  प्रथम सत्र प्रवेशासाठी 11 जुलैपर्यंत मुदतवाढ           

भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या  प्रथम सत्र प्रवेशासाठी 11 जुलैपर्यंत मुदतवाढ                                             भंडारा, दि. 16 : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील (आय.आय.एच.टी.) सन 2022-2023 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या पथम सत्राकरिता महाराष्ट्रातून बरगढ (ओडिशा) करीता 13 + 1, वेंकटगिरीकरीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांच्या मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज 10 जून 2022 पर्यंत प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करण्यास कळविण्यात आले होते. परंतु आता इच्छुक उमेदवारांना 11 जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त कार्यालयास 11 जुलैपर्यंत सादर करावेत, असे वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांल परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे.

विदर्भातील 11 जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, प्रशासकीय इमारत क्रमांक 2, 8 वा माळा, बि – विंग, सिव्हिल लाईन, नागपूर-440001, दुरध्वनी क्रमांक – 0712-2537927 यांचे कडून प्राप्त करुन घ्यावी. अर्जाचा नमुना व विहीत पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे, असे प्रादेशिक उपायुक्त, (वस्त्रोद्योग) सीमा पांडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.