अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत

व्याज परतावा योजना

        भंडारा, दि. 1 : ज्या समाज घटकांकरिता कोणतेही महामंडळ नाही. अशा मराठा, ब्राम्हण इत्यादी समाजातील आर्थिक मागास (8 लाखाच्या मर्यादेत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न) असलेल्या नागरिकांना बँकेमार्फत विविध उद्योग, व्यवसाय सुरू करण्याकरिता किंवा व्यवसाय वाढविण्याकरिता मिळणाऱ्या कर्ज रक्कमेतील व्याजाचा परतावा करुन आर्थिक बोजा कमी करणे हे उद्दिष्ट असून त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत तीन योजना कार्यान्वित आहेत.

            वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना– आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बँकेतर्फे स्वंरोजगार, उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची रक्कम महामंडळाकडून  लाभार्थ्यांना दिला जाईल.

 गट कर्ज व्याज परतावा योजना- या योजनेंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीच्या गटाकरिता 25 लाखाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तीच्या गटाकरिता 35 लाखाच्या मर्यादेवर, चार व्यक्तीच्या गटाकरिता 45लाखाच्या मर्यादेवर तर त्यापेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाखापर्यंतच्या उद्योग कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या गटाला दिली जाईल.

गट प्रकल्प कर्ज योजना- महामंडळामार्फत सदर योजनेंतर्गत पात्र शेतकरी उत्पादक कंपनीला 10 लाखांपर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योजकाकरीता देण्यात येईल.

             योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ज्या प्रवर्गासाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा प्रवर्गातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या वयोर्मादेची अट पुरुषांकरीता 18 ते  50 तर महिलांकरीता 18 ते 55 वर्ष असेल. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळवर अर्ज करावा तसेच जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे संपर्क साधावा.