आदिवासी जबरानजोत गैरआदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन तहसील कार्यालय सिंदेवाही समोर राजु झोडे

सिंदेवाही/तालुक्यातील आदिवासी जबरानजोत गैरआदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन तहसील कार्यालय सिंदेवाही समोर राजुभाऊ झोडे यांच्या नेतृत्वात भव्य धरणे आंदोलन दिनांक २८ जूनला करण्यात आले.तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करण्यात यावी. वनहक्क कायद्यानुसार आदिवासी गैरआदिवासीना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. वन विभागाच्या शेतकऱ्यांवरच वाढता अन्याय बंद करण्यात यावा. जबरान जोत शेतकऱ्यांचा प्रश्नांचा तात्काळ निपटारा करावा. वहिवाट झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात मुनाऱ्या टाकू नये. या प्रमुख मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी जबरानजोत गैर आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडविल्याशिवाय गप्प बसणार नाही.माझ्या शेतकरी बांधवावर होत असलेला कुठल्याही प्रकारचा अन्याय मी सहन करणार नाही. त्यांच्या हक्कांसाठी लढतांना मी स्वतःच्या अंगावर गोळ्या झेलायला तयार आहे. पण मी शासनाकडून होत असलेला शेतकऱ्यावरील जुलूमाविरुद्ध वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून बंड करून उढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.असे आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडी विदर्भ समन्वयक मा. राजुभाऊ झोडे बोलत होते.
आंदोलनात सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी बांधव,युवावर्ग व वंचित बहुजन आघाडीचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.