स्वाधार योजना व समान संधी केंद्र जनजागृती शिवाराचे आयोजन

स्वाधार योजना व समान संधी केंद्र जनजागृती शिवाराचे आयोजन

 

भंडारा, दि. 18 मे : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आलेली आहे. मागासवर्गीय शासकिय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकिय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी पात्र विद्यार्थी यांना पुढील शिक्षण घेता यावे. म्हणून भोजन, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर सुविधा विद्यार्थ्यांनी स्वतः उपलब्ध करण्याकरीता अर्ज व तत्सम बाबींबाबत जनजागृती शिबीर तसेच समान संधी केंद्र जनजागृती शिबीराचे आयोजन दि. 22 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

 

शिबीराला प्रादेशिक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नागपुर डॉ. सिध्दार्थ गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ईच्छुक विद्यार्थ्यांनी शिबीरात उत्स्पुर्तपणे सहभाग घेवून लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.