आयुक्तांनी केली वडगाव झोन अमृत योजनेची पाहणी   पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे निर्देश

आयुक्तांनी केली वडगाव झोन अमृत योजनेची पाहणी  
पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे निर्देश

चंद्रपूर १८ मे – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे वडगाव झोन हवेली गार्डन परिसरातील काम पूर्ण झाले असुन सदर कामाची आयुक्त विपीन पालीवाल यांनी पाहणी केली व पाणी पुरवठ्यासंबंधी सर्व तक्रारी सोडवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.
पाणी पुरवठा झोन क्र. १५ अंतर्गत हवेली गार्डन येथे अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेले आहे.१७ मे रोजी आयुक्त विपीन पालीवाल,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपअभियंता विजय बोरीकर,प्रभागाचे माजी नगरसेवक देवानंद वाढई,पप्पू देशमुख यांनी त्रिमूर्ती नगर,गणपती मंदिरा जवळील परिसर,लक्ष्मी सलुजा जवळील परिसर,मुस्तफा कॉलनी,स्नेह नगर,हरदेव किराणा चौक इत्यादी परिसरात भेट देऊन योजनेची पाहणी केली तसेच काही घरांना भेट देऊन पाणी पुरवठ्यासंबंधी समस्या जाणून घेतल्या.
या परिसरातील अमृत योजनेअंतर्गत नळ जोडणीची कामे पूर्ण झाली आहे.अनेक जागी मीटर लावण्याचे काम पूर्ण झाले असुन काही जागी शिल्लक आहे तसेच काही किरकोळ गळती दुरुस्ती करण्याचेही काम सुरु आहे. या त्रुट्या दुरुस्त करून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले आहेत.