पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराकरिता 20 मे पर्यंत अर्ज आमंत्रित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराकरिता 20 मे पर्यंत अर्ज आमंत्रित

 

भंडारा, दि. 17 मे : महिलांच्या सामाजिक क्षेत्रातील विविध आघाड्यांवर केलेल्या कामगिरीला गौरवांकित करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराकरिता 20 मे पर्यंत अर्ज आमंत्रित

31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त ग्रामपंचायत क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या दोन कर्तबगार महिलांची निवड करून त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या इच्छूक महिलांनी 20 मे 2023 पर्यंत आपल्या स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले आहे.