सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत अंतर्गत होणाऱ्या कामाचे नियोजन समजा समजेना ….

सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत अंतर्गत होणाऱ्या कामाचे नियोजन समजा समजेना ….

संपादक – मिथुन मेश्राम सिन्देवाही

सिंदेवाही ग्रामपंचायतीला नगरपंचायत चा दर्जा मिळावा त्यासाठी अनेक सामाजिक , राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन निवेदनाच्या मागणितुन,आंदोलन, उपोषण करत सिंदेवाही ग्रामपंचायत च्या निवडनणुकीवरही बहीष्कार टाकुन शेवटी राज्य शासनाला सिंदेवाही ग्रामपंचायतीला नगरपंचायत चा दर्जा देण्यास भाग पाडले. त्या आंदोलनात सहभागी असनाऱ्या नेत्यांनी फक्त सिंदेवाही शहराचा विकास व्हावा यासाठी अथक परिश्रम घेत आंदोलन उपोषण केले होते हे मात्र सत्य आहे.

सिंदेवाही ला नगरपंचायतचा दर्जा मिळुन पाच वर्षे पूर्ण होत नाहीतर लोनवाही, आंबोली या गावाचं सिंदेवाही नगरपंचायत मधे समाविष्ट करून सिदेवाही- लोनवाही असं नाव नगरपंचायतला देण्यात आले. यामुळे नेमका कुनाचा फायदा कितपत झाला असेल हे मात्र सांगन कठीण आहे.

अवकाळी पावसाच्या अगोदर नाली,रस्ते, सार्वजनिक परिसराची स्वच्छता व्हायला पाहिजे होती मात्र अद्याप असं झालेलं दिसत नाही.

सिंदेवाही – लोनवाही नगरपंचायतला पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था आजपर्यंत करता आली नाही हे मात्र शोकांतिका आहे.
आजही पिण्याच्या पाण्यासाठी सिंदेवाही – लोनवाही शहरातील नागरिकांना दिवस रात्र धावपळ करावी लागते आहे. एक दिवसा आड पाणी वितरण होत असेल तर महिन्यांचं नळ बिलाची रक्कम सुद्धा नळ धारकांकडून अर्धीच घ्यायला पाहिजे.

सिंदेवाही शहरात काही भागात पाणी एटिएम मशीन लावण्यात आली तर काही भागात एटिएम मशीन जाणिवपूर्वक लावण्यात आली नाही.
पाणी एटिएम मशीन जिथे लागले आहेत तिथे वारंवार मशीन बंद पडण्याच्या तक्रारी आहेत. तर काही पाणी एटीएम मशीन मधुन पिण्याच्या पाण्याची योग्य चव नसल्याचे आणि नळाची धार एकदम बारीक आहे अशीही तक्रारी आहेत.

सिंदेवाही शहराचा विकासाच्या नावाखाली चांगले रस्ते ,नाली तोंडुन नविन बांधण्याचा सपाटा मात्र चांगलास सुरू आहे. या कामात कुनाचे जास्त फायदे होत आहे हे आपल्याला माहीत आहे.

रस्ते व नालीचे काही कामे निकृष्ट दर्जाचे असल्याने झालेली कामे वर्षभरात दम सोडत असल्याचे दिसून येत आहे.
काही ठिकाणी चुकिच्या इंजिनिअर प्लॅन मुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरते आहे.
नाल्याचा बांधकाम घरातील सांडपाणी बाहेर काढण्यासाठी असतो मात्र परिस्थिती उलट झाली आहे.नालीच पाणी घरात जात आहे.
लोकांच्या घरांचा विचार करून रस्ते व नाली बांधकाम करायला पाहिजे होती मात्र उलट झालं आहे.

लॉकडावुन च्या काळात माक्स च्या नावाखाली शेतकरी,शेतमजूर कामगार यांचेकडून शंभर शंभर रुपये दंड वसूल केला होता परंतु त्यांच लोकांना पाच रूपयांचे माक्स मात्र नगरपंचायतीने देवू शकले नाहीत.
सेनेटायझर मशीन कार्यालयात व बाजार परीसरात लावण्यात आली होती मात्र काही दिवसांतच जादुई शक्तीने गायब झालीत.

लॉकडाउनंतर नगरपंचायतीने सिंदेवाही शहरातील नागरीकांकडुन घर टॅक्स,नळ टॅक्स,इतरही टॅक्स वरती सुट तर दिली नाही. मात्र ज्यांच्याकडे टॅक्स बाकी होते. त्यांच्याकडुन रक्कमेवर व्याज (शास्ती) लावण्यात आले याची पुर्व सुचना टॅक्स धारकांना दिली नव्हती व टॅक्स भरण्यासाठी (शास्तीच्या कार्यवाहीची) सवलत दिली नव्हती असा अन्याय नगरपंचायतने केला आहे.

काल परवा बाजार चौकातील दुकानासमोरील अतिक्रमण हटविण्यात आले. काही व्यावसायिकांचे साहीत्य जप्ती करण्यात आले. परंतु नगरपंचायतचे गाडे येथील असलेल्या दुकानाचा अतिक्रमण कायम आहे. तर नेमका नगरपंचायतला कुणाचं अतिक्रमण हटवुन कुनाची साहीत्य जप्ती करायची होती हे समजायला कुनी उत्तर दिले नाहीत.
आरोग्य विषयक काही बोलायचं कामंचं नाही नाल्यांमध्ये औषधी कधी फवारणी केली होती माहिती नाही. मात्र शहरभरात डासांचा मोठा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

सिंदेवाही नगरपंचायतने प्रत्येक प्रभागात नागरिकांसाठी तक्रार पेटी लावण्यात यावी जेनेकरून लोकांना आपल्या परिसरातील समस्या लिहून सांगता येतील किंवा सिंदेवाही शहरातील नागरिकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी मोबाईल क्रमांक ची व्यवस्था करण्यात यावी अशी मागनी सुजाण नागरिकांनी केली आहे.