चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

 

चंद्रपूर ११ एप्रिल – स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती चंद्रपूर महानगरपालिकेत तसेच मनपा शाळांमध्ये साजरी करण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य सामाजीक दृष्ट्या किती महत्वाचे होते सांगून स्त्री शिक्षणातील त्यांचे योगदान आयुक्त यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे,सारंग निर्मळे,विकास दानव,गुरुदास नवले, माधुरी दाणी, ग्रेस नगरकर,ज्योती व्यवहारे, शारदा भुक्या तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

मनपा शाळांमध्ये सुद्धा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी तसेच शिक्षकांनी क्रांतिसूर्य म. फुले यांच्या जीवनचरित्रावर वर प्रकाश टाकला तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.