ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे मे महिन्यात आयोजन

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे मे महिन्यात आयोजन

भंडारा, दि. 28 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 17 ते 20 मे, 2022 या चार दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  त्याअनुषंगाने  नामांकित कंपन्या आणि नियोक्त्यांनी रिक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर online job fair Bhandara-1 येथून आपल्या आवश्यकतेनुसार बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध असलेली यादी ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करावी. तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता कार्यालयाचे ऑनलाईन नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांचेशी 07184- 252250 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांनी केलेले आहे.